काँग्रेस आमदाराची लेक आहे 'ही' बॉलिवूड अभिनेत्री!

काँग्रेस आमदाराची लेक आहे 'ही' बॉलिवूड अभिनेत्री!

नेहा शर्मा खूप सुंदर आहे, पण 20 वर्षांत ती बॉक्स ऑफिसवर आपल्या अभिनय आणि सौंदर्याची जादू दाखवू शकलेली नाही.

21 नोव्हेंबर 1987 रोजी बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात जन्मलेल्या नेहा शर्माचे वडील बिहारच्या राजकारणातील मोठं नाव आहे.

तिचे वडील काँग्रेस पक्षाचे अजित शर्मा भागलपूरचे आमदार आहेत.

आमदाराची मुलगी असल्यानं नेहाचं बालपण सुख समृद्धीत गेलं.

नेहा शर्मा 2000 च्या दशकात मुंबईत आली. 2003 मध्ये नेहा शर्मानं ‘रघु रोमियो’ या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली.

2010 मध्ये ‘क्रुक: इट्स गुड टू बी बॅड’मध्ये इमरान हाश्मीसोबत तिने बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. पण हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही.

अनेक सिनेमात काम करूनही नेहाला अजून एकही सोलो हिट मिळालेला नाही.

आमदाराची मुलगी असल्यामुळे नेहा शर्माला बॉलिवूडमध्ये एंट्री मिळाली, पण आजपर्यंत नेहाला आपलं करिअर घडवता आलेलं नाही.

आता 20 वर्ष चित्रपटसृष्टीत काम केल्यानंतर तिनं टीव्ही आणि ओटीटीवर करिअर करण्याचा निर्णय घेतला आहे.