कारच्या बॉडीवरुन असे हटवा होळीचे रंग, गाडी होईल चकाचक

होळी हा रंगांचा उत्सव आहे, आपल्या सर्वांसाठीच हा आनंदाचा क्षण असतो. पण अनेकदा रंगांमुळे अडचणींचा सामना करावा लागतो.

हे रंग तुमच्या कारच्या बॉडीवर लागतात, तेव्हा टेन्शन येतं. पण आज आपण कारच्या बॉडीवरुन होळीचे रंग सहज काढण्याचे काही अचूक उपाय जाणून घेऊया.

सर्वात भारी उपाय आहे की, तुम्ही तुमची कार पूर्णपणे कव्हर करा. ज्यामुळे रंग लागणार नाहीत.

कारच्या बॉडीवर कलर लागले तर ते शाम्पूने स्वच्छ करा. यासोबतच तुम्ही बेकिंग सोडा वापरु शकता.

चुकूनही डिटर्जेंटचा वापर करु नका, यामुळे पेंटला नुकसान होतं.

बाजारात अनेक कार क्लिनिंग सोल्यूशनही मिळतात. जे सहज वापरले जाऊ शकतात. सोबतच जिद्दी डाग हटवण्यासाठी तुम्ही विनेगरचा वापरही करु शकता.

कारच्या केबिनवरुन रंग हटवण्यासाठी तुम्ही शाम्पू कपड्याला लावून ते डागांवर घासा. यासाठी मायक्रो फायबर क्लॉथचा वापर करा. हार्ट कलरसाठी स्टेन रिमूव्हरचा उपयोगही करु शकता.

कारच्या केबिनमध्ये चांगल्या स्वच्छतेसाठी सीट कव्हर, डॅशबोर्ड, स्टोरेज स्पेस, पॉकेट आणि सेंट्रल कंसोलसारखा एरिया नीट स्वच्छ करा. तुम्ही व्हॅक्यूम क्लीनरचा वापरही करु शकता.

कार पूर्णपणे स्वच्छ केल्यानंतर पाण्याने धुवा आणि सुकू द्या. कार पूर्ण सुकल्यावर बॉडीवर व्हॅक्सची एक कोटिंग करा.