मानेच्या मागचा काळसरपणा 'असा'  दूर करा!

धूळ आणि उन्हामुळे त्वचा काळसर होते.

चेहऱ्यावर तेज यावं यासाठी आपण विविध उपाय करतो.

प्रदूषण आणि उन्हामुळे मानेच्या मागचा भाग सर्वाधिक काळा होतो.

हा काळसरपणा दूर करण्यासाठी कोरफडाच्या गराचा वापर करावा.

कोरफड त्वचेतील मेलनिन इफेक्ट बॅलन्स ठेवतं.

त्यासाठी कोरफडाचा गर घेऊन मानेमागे हलक्या हाताने मसाज करा. 15 ते 20 मिनिटांनी मान धुवा.

दूध किंवा दह्यात बेसन मिसळून जवळपास अर्धा तास मानेला लावून ठेवल्यास त्यानेही काळसरपणा दूर होतो.

तसंच मानेचा काळसरपणा कमी करण्यासाठी एका वाटीत कच्च दूध घ्या.

कापसाने हे दूध मानेला लावून 20 मिनिटांनी धुवून घ्या.