AC चं तापमान नेमकं किती ठेवायचं?

आजकाल अनेक घरांमध्ये असतो एसी.

आज आपण पाहूया एसीचं तापमान नेमकं किती असायला हवं?

त्यामुळे वातावरण Cool राहीलच, शिवाय वीजही वाचेल.

सरकारने एसीचं डिफॉल्ट सेटिंग 24 डिग्री सेल्सियस ठेवलं आहे.

तज्ज्ञसुद्धा सांगतात की, आरोग्यासाठी हेच तापमान योग्य आहे.

विविध अभ्यासांमधून असं समोर आलंय की, एसीच्या दर तापमानामागे 6 टक्के विजेची बचत होते.

एसीचं तापमान जितकं कमी असेल, तितकंच कंप्रेसर वेगाने काम करतं आणि विजेचं बील जास्त येतं.

एसी 24 डिग्री सेल्सियसवर असेल तर ते आरोग्यासाठीही उत्तम असतं.

डॉक्टरही सांगतात की,  24 डिग्री सेल्सियस तापमान मानवी शरिरासाठी पुरेसं आहे.