AC वापरुनही कमी येईल वीज बिल, या आहेत सोप्या ट्रिक

उन्हाळा सुरु झालाय. आता अनेक घरांमध्ये एसी ऑन झाले असतील. याने गारवा मिळतो पण वीज बिल पाहून टेन्शन वाढतं.

एसी वापरुनही वीज बिल कमी यावं यासाठी काही ट्रिक्स आपण जाणून घेणार आहोत.

एसी कधीच किमान तापमानावर सेट करु नका. तापमान 24 च्या जवळपास सेट करा. यामुळे वीजेची अधिक बचत होईल आणि बिल कमी येईल.

एसीचं पॉवर स्विच नेहमीच बंद करा. अनेक लोक रिमोटने एसी बंदतात. मात्र असं करु नये.

पॉवर स्विच बंद न केल्याने कंप्रेसर ‘आयडल मोड’वर सेट केलं जातं तेव्हा सर्व वीज वाया जाते आणि वीज बिल वाढतं.

सर्व एसी टायमरसोबत येतात. यामुळे मशीन पूर्ण रात्र चालवण्याऐवजी या फीचरचा वापर करा.

झोपण्यापूर्वी किंवा इतर वेळी थेट 2-3 तासांसाठी टायमर सेट करणं नेहमी चांगलं असते. यामुळे वीजेत कपात होते.

एसीची सर्व्हिसिंग करुन घ्या, ज्यामुळे यातील बिघाड कळतील आणि एसी चांगला असल्यास वीज बिल कमी येईल.

एसी चालू करण्यापूर्वी खोलीमधील प्रत्येक दरवाजा योग्य प्रकारे बंद करा. यामुळे रुम लवकर थंड होते आणि वीज वाचते.