बॉलिवूडची क्वीन' किती कोटींची मालकीण?

कंगना रनौत निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाली आहे.

ती तिचं जन्मगाव मंडीमधून भाजपकडून 2024 ची निवडणूक लढवणार आहे.

इंडस्ट्रीत कोणताही गॉडफादर नसणाऱ्या कंगनानं आजवर किती कोटींची कमाई केली आहे जाणून घ्या.

कंगनाचे वडील बिझनेसमन आहेत तर आई शाळेत शिक्षिका आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंगना एका चित्रपटासाठी अंदाजे 15 ते 25 कोटी रुपये घेते.

फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार कंगनाची एकूण संपत्ती 124 कोटी रुपये आहे.

कंगना दर महिन्याला 1 कोटींहून अधिक कमावते.

कंगनाचा हिमाचलच्या मनालीमध्ये जवळपास 25 कोटी रुपयांचा आलिशान बंगला आहे.

मुंबईतही 15 ते 20 कोटी रुपयांचं आलिशान घर आहे. याशिवाय पाली हिलमध्ये तिचं सुमारे 40 कोटी रुपयांचं कार्यालय बांधलं जात आहे.

कंगनाकडे 75 लाखांची Mercedes-Benz GLE SUV, 34.75 ते 43.61 लाखांची Audi Q3 तसेच 35 कोटी रुपयांची BMW 7 या आलिशान गाड्यांचा तिच्या ताफ्यात समावेश आहे.