घामामुळे अंगाला येणारी दुर्गंधी दूर करण्याचे 5 उपाय

घामाचा वास घालवण्यासाठी कडूनिंबाची पानं पाण्यात टाकून त्या पाण्यानं आंघोळ केली तर निश्चित फायदा होतो.

कडुलिंबाच्या पानांमुळे घामाचा दुर्गंध नाहीसा होतो, तसंच घामातले बॅक्टेरियासुद्धा मरून जातात.

लिंबाच्या रसामध्ये बेकिंग सोडा मिसळून, तो जर काखेत लावला तर घामाचा दुर्गंध येत नाही.

तुमच्या शरीराला जर घामाचा वास खूपच जास्त येत असेल तर डाळीच्या पिठाचा वापर करू शकता.  

दह्यामध्ये डाळीचं पीठ मिसळायचं आणि ते मिश्रण अंगाला लावून रोज थंड पाण्याने आंघोळ करायची. हा प्रयोग रोज केला तर फरक दिसेल.

जेल आणि शॅम्पू स्वरूपातील साबणाचा वापर आंघोळीसाठी केल्यास शरीराला घामाचा वास येणार नाही.

आंघोळीच्या पाण्यात जर गुलाबपाणी मिसळलं तरीही तुमची घामाच्या दुर्गंधीपासून सहज सुटका होईल.

घामाचा वास घालवण्यासाठी पुदिन्याची पानंसुद्धा गुणकारी आहेत. पुदिन्याची वाटलेली पानं आंघोळीच्या पाण्यात टाकावीत त्यावर तुरटीसुद्धा फिरवता येईल.

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा