Summer Tips:  AC ऑन करण्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवाच!

AC मध्ये जे फिल्टर असतं ते हवेतील धूळ आणि घाण शोषून घेतं.

त्यामुळे या फिल्टरमध्ये धूळ जमा होते.

त्यामुळे उन्हाळ्यात AC ऑन करण्याआधी फिल्टर व्यवस्थित साफ करा.

त्याचा AC च्या कुलिंग कॅपेसिटीवर काहीही परिणाम होणार नाही.

आउटडोअर युनिटसुद्धा साफ करा.

कंडेनसर आणि इव्हेपोरेटर कॉइल्समध्ये कालांतराने घाण जमा होते.

उन्हाळ्यात AC पहिल्यांदा ऑन करण्यापूर्वी ही घाणही साफ करून घ्या.

तसंच रेफ्रिजरेटर लेव्हल चेक करा.

ACच्या सर्व कनेक्टेड व्हायर व्यवस्थित आहेत ना, हेसुद्धा एकदा तपासून पाहा.

AC ऑन केल्यानंतर मोड आणि टेम्परेचर व्यवस्थित आहे ना, हेदेखील पाहा.