'अशी' मॅगी बनवून तुम्ही याआधी कधीच खाल्ली नसेल!

आधी मॅगी नूडल्स शिजवून घ्या.

शिजवल्यानंतर थंड करा आणि त्यात मीठ घाला.

एका पॅनमध्ये तेल तापवून त्यात सोनेरी रंग येईपर्यंत कांदा तळा.

त्यात शिमला मिरची, गाजर आणि फ्रेंच बीन्स घाला.

सर्व भाज्या एकजीव होईपर्यंत शिजूद्या.

भाज्यांमध्ये सोया सॉस, चिली सॉस आणि व्हाईट व्हिनेगर घाला. हे मिश्रण 2-3 मिनिटं परतवा.

आता यात शिजवलेले नूडल्स घाला आणि व्यवस्थित मिक्स करा.

शेवटी काळीमिरी पावडर घाला.

आता तुमची हॉट चायनीज स्टाईल मॅगी तयार आहे.