कडक उन्हात Heat Wave पासून असं राहा सुरक्षित!

उन्हाळ्यात बऱ्याचदा अनेक लोकांना उष्माघात म्हणजेच हिट वेव्हचा त्रास होतो. काहीवेळा उष्माघातात तातडीने उपचार न मिळाल्यास व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो.

त्यामुळे उन्हाळ्यात घराबाहेर पडताना खूप काळजी घेण्याची गरज असते. काही उपायांनी तुम्ही सुरक्षित राहू शकता. 

नेहमी हायड्रेटेड राहा. जास्त वेळ उन्हात चालल्याने जास्त घाम येतो आणि डिहायड्रेशन होऊ शकते. त्यामुळे शक्य तितके पाणी आणि द्रवपदार्थ घेत राहा. 

सर्वात महत्त्वाचं म्हणजे विनाकारण घराबाहेर पडू नका. उन्हाळ्यात शक्य तितकं घरात राहणं स्वतःची काळजी घेण्यासारखच आहे. 

काही कारणास्तव तुम्हाला घराबाहेर जायचे असल्यास छत्री घेऊन जा. त्याचबरोबर स्कार्फ आणि पूर्ण बाह्यांचे कपडे घाला.

उन्हाळ्यात पौष्टिक आहार घ्या आणि शक्य तितके बाहेरचे तळलेले अन्न खाणे टाळा. उघड्यावरचे अन्न तर अजिबात खाऊ नका.

उष्माघात टाळण्यासाठी नारळपाणी, ताक यासोबतच सत्तूचे सेवन करा. यामुळे तुमच्या शरीराला थंडावा मिळेल. 

उष्माघातापासून सुरक्षित राहण्यासाठी कलिंगड, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी अशी हंगामी फळे आणि भाज्या खा.