चिकन की मटण.. काय खाल्ल्याने मिळतं जास्त प्रोटीन?

मांसाहार प्रोटीनचा उत्तम स्रोत मानला जातो. भारतात अधिकतर मांसाहारामध्ये चिकन आणि मटण या दोन गोष्टी जास्त लोकप्रिय आहेत.

चिकन आणि मटण हे दोन्ही प्रोटीनचे चांगले स्रोत आहेत. पण दोघांपैकी कशात जास्त प्रोटीन आढळते ते जाणून घेऊयात.

एक किलो चिकनमध्ये जवळपास 270 ग्रॅम प्रोटीन आढळते.

चिकनमधून 270 ग्रॅम प्रोटीन मिळत असले तरी तुम्ही चिकन शिजवण्यासाठी कोणती पद्धत वापरता हे देखील महत्वाचं आहे.

एक किलो मटणमध्ये जवळपास चिकन इतकेच प्रोटीन असते. तसेच मटणमधून मिळणारे प्रोटीन हे तुमच्या शिजवण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते.

चिकनमध्ये मटणच्या तुलनेत कमी कॅलरीज असतात. त्यामुळे वेट लॉस सह मसल्स गेन करण्यासाठी चिकनचे सेवन करू शकता.

चिकन आणि मटण किती खायला हवे हे तुमच्या पचनशक्ती आणि वजन यावर अवलंबून आहे.

चिकन असो वा मटण या दोघांच्या सेवनाने तुम्हाला जास्त फायदा तेव्हाच होईल जेव्हा ते शिजवण्यासाठी तुम्ही कमी मसाले आणि तेलाचा वापर कराल.