AC, कुलर चालू, बिल कमी कसं येईल?

उन्हाळ्यात अंगाची काहिली होत असताना आल्हाददायक एसी आपल्या विजेच्या बिलाचा आकडा वाढवतो.

या विचारानं आपण पुन्हा घामाघूम होतो आणि एसीचा आनंद विसरून जातो. 

बिल नियंत्रित राखण्यासाठी या टिप्स उपयुक्त ठरतील.

द ब्यूरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी यांच्या माहितीनुसार, 24 अंश सेल्सिअस तापमानावर एसी वापरला तर ते योग्य आहे.

आपल्या शरीराच्या तापमानासाठी एसी याच तापमानावर असावा. 

ते एक युनिट कमी केल्यास विजेचा वापर सहा टक्क्यांनी वाढतो.

त्यामुळं ते टाळण्यासाठी 24 अंशांवर एसी ठेवून घरामध्ये आल्हाददायक वातावरण निर्माण करता येईल.

प्रत्येक ऋतूमध्ये एकदा तरी सर्व्हिसिंग केल्यामुळे बिल सतत वाढत नाही. 

झोपण्यापूर्वी एसी ऑटो मोडवर ठेवू शकता. म्हणजे खोली थंड झाल्यावर तो आपोआप बंद होईल.