साप समोर दिसला तर काय करावं किंवा करु नये?

झाडा-झुडपात किंवा कधीकधी जंगलात बहुतांश साप आढळतात. पण कधीकधी ते मानवी वस्तीत ही येतात.

साप विषारी असोत किंवा नसोत, त्याला पाहिलं तरी लोकांची हालत खराब होते.

मग अशावेळी काय करायचं आणि काय करु नये असा प्रश्न अनेकांना पडतो. चला एक्सपर्टकडून जाणून घेऊ.

सापाला घाबरुन त्यावर हल्ला करु नका किंवा त्याला तिथून हकलवण्याचा प्रयत्न करु नका.

तुम्ही सापाला त्रास दिला नाहीत, तर तो देखील तुम्हाला त्रास देणार नाही.

दुसरी गोष्ट लाइट जास्त असेल तर ती कमी करा, ज्यामुळे आपण संकटात आहोत, असं सापाला भासणार नाही.

तुम्ही कुठलातरी जोरात आवाज तयार करुन सापाला घाबरवू शकता.

सापाला कान नसतात. पण कंपनाच्या सह्याने साप ते ओळखू शकतो. ज्यामुळे तो पळून जाऊ शकतो.

जवळील एखाद्या सर्प मित्राला बोलवा. तो सापाला कोणतीही इजा न करता तिथून घेऊ जाऊन दूर जंगलात सोडून येईल.