उन्हाळ्यात भरपूर संत्र खा, चेहरा टॅन नाही होणार!

हंगामी फळं खाणं कधीही उत्तम.

कारण फळांमध्ये शरीरपयोगी पौष्टिक तत्त्व असतात.

ज्यामुळे त्वचेसह संपूर्ण शरिराचं रक्षण होतं.

योग्य प्रमाणात फळं खाल्ल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

संत्र विशेषत: त्वचेसाठी फायदेशीर असतं.

संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असल्यामुळे त्याचा त्वचेला फायदा होतो.

उन्हाळ्यात चेहऱ्यावर पिंपल येतात.

त्यांपासून सुटका मिळवण्यासाठी संत्र खावं.

महत्त्वाचं म्हणजे संत्र्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

संत्र्यामुळे शरिराची पाण्याची गरजही भागते.