VIDEO  पाकिस्तानी अभिनेत्रीला 'गुलाबी साडी' गाण्याची भुरळ!

सध्या इन्स्टाग्रामवर एकच गाणं ट्रेंडिंग आहे ते म्हणजे 'गुलाबी साडी'.

संजू राठोड या तरुणाचं हे गाणं तुफान लोकप्रिय ठरतंय. अनेक सेलेब्स यावरती रील बनवतायत.

आता या गाण्याची भुरळ एका पाकिस्तानी अभिनेत्रीला पडलीये.

पाकिस्तानची लोकप्रिय अभिनेत्री मावरा होकेन हिने  'गुलाबी साडी' या गाण्यावर रील बनवलं आहे.

मावराने'सनम 'तेरी कसम' या बॉलिवूड सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती. त्यामुळे ती भारतातही लोकप्रिय आहे.

मावराने हे रील शेअर करत 'गुलाबी #eid2024' असं कॅप्शन दिलं आहे.

तिचं हे रील तुफान व्हायरल होत असून त्यावर अनेक भारतीय कमेंट करत आहेत.

मावराच्या या पोस्टवर या गाण्याचा गायक संजू राठोडनं देखील 'सुंदर' अशी कमेंट केली आहे.

एका मराठी गायकाच्या गाण्यावर पाकिस्तानी अभिनेत्रीनं रील केल्यानं संजू राठोडवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.