महाग खतंच नाही, या घरगुती वस्तूंनीही वाढेल रोपांचे आयुष्य!

घरातील रोपं निरोगी ठेवण्यासाठी लोक महागड्या वस्तू वापरतात.

घरामध्ये असलेल्या काही साध्या गोष्टी देखील रोपांसाठी चांगल्या परिणाम देतात.

ताक आणि पाण्याचे मिश्रण बनवून रोपांच्या मुळाशी टाकल्याने ते ताजेतवाने होतात.

अ‍ॅस्पिरिन पाण्यात विरघळवून त्याची झाडांवर फवारणी केल्याने झाडांना इजा होणार नाही.

अ‍ॅप्सम मीठ वनस्पतींची वाढ सुधारण्यास मदत करते. यामुळे रोपं वेगाने वाढतात. 

मध आणि पाण्याच्या मिश्रणात बुडवून रोप लावल्यास त्याची मुळे लवकर निघतात. 

रोपं निरोगी ठेवण्यासाठी नारळाच्या पाण्याचा वापर केला जाऊ शकतो.

रोपांवर साबणाचे पाणी फवारल्याने त्यावर असलेले कीटक मरतात.

या घरातील वस्तू अनेक महिने रोपं निरोगी ठेवतात आणि त्यांचे आयुष्य वाढतात.