फक्त 180 रुपयांत खरेदी करा इथं कुर्ता

फक्त 180 रुपयांत खरेदी करा इथं कुर्ता

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. या काळात कामासाठी बाहेर पडलेल्या मंडळींना उष्णता आणि उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो.

बऱ्याचदा उकाडा आणि घामामुळं हैराण व्हायला होतं. तेव्हा अंगावर कॉटनचे मऊसूत कपडे असल्यास काहीसा दिलासा मिळू शकतो.

अनेक पुरुष उन्हाळ्याच्या दिवसांत कॉटनचे कुर्ते, कॉटनचे शर्ट, टीशर्ट परिधान करण्यास प्राधान्य देतात. आपणही कॉटनचे कुर्ते खरेदी करण्याच्या विचारात असाल तर मुंबईतील दादर मार्केट आपल्यासाठी चांगला पर्याय आहे.

दादर जनता मार्केटमधे असलेले वी.आर.बी कलेक्शन येथे पुरुषांचे अनेक व्हरायटीचे कपडे मिळतात. या ठिकाणी पुरुषांचे शर्ट, टीशर्ट, कॉटन कुर्ता, शॉर्ट कुर्ता, फॅन्सी कुर्ता पजामा आदी पर्याय मिळतात.

हे दुकान होलसेल असून या ठिकाणी मिळणाऱ्या मेन्स कुर्तींची किंमत ही 180 रुपयांपासून सुरू होते. अतिशय स्वस्तात सुंदर क्वालिटीचे कुर्ते ते खरेदीदारांना गेल्या 20 वर्षांपासून विकत आहेत.

मेन्स कुर्त्यांचे रिटेल बाजारभाव हे 500 ते 600 रुपये आहेत. परंतु या ठिकाणी फक्त 180 ते 200 रुपयांत पुरुषांचे विविध प्रकारचे कुर्ते मिळतात.

सोबतच स्वस्त दरात पुरुषांचे ब्रँडेड शर्ट, पँट आदी पर्याय या ठिकाणी उपलब्ध असल्याचे दुकानाचे मालक विष्णू भाटिया यांनी सांगितले.

कडू कारल्याच्या शेतीतून शेतकरी लखपती!