फक्त 25 रुपयांपासून इथं खरेदी करा मातीची भांडी

फक्त 25 रुपयांपासून इथं खरेदी करा मातीची भांडी

मातीच्या भांड्यांचे आकर्षण हे हल्ली वाढतच चाललं आहे. पूर्वीपासून जेवण, पाणी तसंच घरात ठेवण्यासाठी मातीच्या भांड्यांचा वापर केला जायचा.

सध्याच्या काळात युनिक आयडिया घेऊन घर सजावट केली जाते. त्यामुळे तुम्हाला पुण्यात स्वस्तात मातीची मिनियचर भांडी कुठे खरेदी करता येतील याबद्दलच माहिती देणार आहोत.

पुण्यातील कुंभार वाडा येथे असलेल्या माऊली आर्ट्स या दुकानात मातीची भांडी पाहिला मिळतात. या दुकानाचे मालक संतोष कुंभार आहेत.

या मातीच्या भांड्यांची किंमत 25 रुपयांपासून सुरु होते. या भांड्यांना मार्केटमध्ये प्रचंड मागणी देखील आहे. या भांड्यांच्या वापर शोभेसाठी तुम्ही करू शकता.

मातीपासून बनवलेली मिनिएचर भांडी आम्ही विक्री करतो. यातील काही भांडी आम्ही स्वतः तयार करतो.

गेली 20 झालं आम्ही हा व्यवसाय करत आहोत. आमच्याकडे मातीची भांडी, लहान पॉट्स यामध्ये जवळजवळ 40 प्रकार पाहिला मिळतात.

हॅन्डमेड जग, बॉटल, ताट, वाटी, लहान मुलांची खेळणी, भातुकली, वारकरी सेट, बारा बलुतेदार अशी वेगवेगळी खेळणी आहेत.

याची किंमत 25 रुपयांपासून सुरु होते, अशी माहिती माऊली आर्ट्स दुकानाचे मालक संतोष कुंभार यांनी दिली आहे.

फक्त 180 रुपयांत खरेदी करा इथं कुर्ता