दुसऱ्यांदा प्रेमात पडलीय मानसी नाईक! कोण आहे तो?

आपल्या नृत्यानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री मानसी नाईक गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आली आहे.

काही महिन्यांपूर्वीच मानसीचा घटस्फोट झाला.

आता मानसी पुन्हा लग्न करण्यासाठी सज्ज झाली आहे.

मानसीसोबत पॅरिसमध्ये नक्की कोण होतं त्याचा फोटो समोर आला आहे.

मानसी पॅरिसमध्ये राहुल खिसमत्रो या व्यक्तीसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत होती.

राहुल एक अंतराळ शास्त्रज्ञ आहे. तो भारतात राहत नाही.

राहुलने आयफेल टॉवरसमोर मानसीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

त्यानंतर आता मानसी नाईक लवकरच दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार असल्याचं बोललं जातं.

तसंच मानसी लग्नानंतर भारतात नाही जर्मनीमध्ये स्थित होणार असल्याचंही ती म्हणाली होती.