मराठवाड्यात काश्मिरी सफरचंदाचा यशस्वी प्रयोग 

मराठवाड्यात काश्मिरी सफरचंदाचा यशस्वी प्रयोग 

वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती आणि बाजारभावाचं गणित हातात नसल्याने शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. मात्र या अडचणींना सामोरं जात शेतकरी आपल्या शेतात नवनवे प्रयोग करत असतो.

मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागातील शेतकरी महादेव सुपेकर यांनी आपल्या शेतामध्ये देखील असाच अनोखा प्रयोग केला आहे.

हिमाचल प्रदेशातून विमानानं रोपं आणून त्यांनी साडेतीन एकर क्षेत्रावर सफरचंदाची लागवड केली. आता ही रोपं 4 वर्षांची झाली असून फळांनी लगडली आहेत.

सुपेकर यांनी सफरचंदाच्या शेतीचं नियोजन कसं केलं? याबाबत जाणन घेऊ.

शेतकरी महादेव सुपेकर हे जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे राहतात. त्यांचे मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील आहे.

मात्र शासकीय नोकरीच्या निमित्ताने ते घनसावंगी येथे स्थायिक झाले. आवड म्हणून शेती व्यवसायात रमू लागले.

काश्मीर, हिमाचल प्रदेशात पिकणारे सफरचंद मराठवाड्यात का पिकणार नाही? असा प्रश्न त्यांना पडला आणि त्यांनी सफरचंदाची शेती करण्याचा निर्णय घेतला.

हिमाचल प्रदेशातून मागवलेली रोपे सुपेकर यांनी साडेतीन एकर क्षेत्रात लावली. 12 बाय 12 फुटांवर या रोपांची लागवड केली.

या रोपांना पाण्याची फारसी आश्यकता नसते. तसेच हलक्या प्रतीची जमीन आवश्यक असते.

सुपेकर यांनी योग्य नियोजन केल्याने तिसऱ्या वर्षी रोपांना सफरचंद लगडण्यास सुरुवात झाली. यंदा ही झाडे 4 वर्षांची झाली असून प्रत्येक झाडावर 10 ते 12 किलो सफरचंद आहेत.

उन्हाळ्यात 'ही' 4 पिकं घ्या, शेतात उगवेल सोनं