कुत्र्याने अचानक हल्ला केला तर स्वतःचे संरक्षण कसं करावं?

खूप कमी लोक असतील ज्यांना आयुष्यात कधीतरी रस्त्यावर किंवा रस्त्याने चालताना कुत्र्याने पळवलं किंवा घाबरवलं नसेल.

जेव्हा एखादा कुत्रा किंवा कुत्र्यांचा समूह अचानक धावू लागतो तेव्हा बहुतेक लोक गोंधळून जातात.

कुत्र्यांच्या धावण्यामुळे लोक घाबरून वेगाने धावू लागतात. मात्र असे असूनही कुत्रे पाठलाग सोडत नाहीत

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कुत्र्याने तुमच्यावर असा हल्ला केला तर काय करावे आणि त्यामागील कारण काय असू शकते.

कधीकधी असंतुलित आहारामुळे कुत्रे माणसांच्या मागे धावतात.

जेव्हा कुत्र्यांना त्यांच्या प्रदेशांचे संरक्षण करण्यास अस्वस्थ वाटते तेव्हा ते प्रत्येक गोष्टीसाठी आक्रमक होतात.

जेव्हा कुत्र्यांना वाटतं की दुसऱ्या भागातील एखादी व्यक्ती आपल्या भागात घुसली आहे, तेव्हा ते आक्रमक होतात आणि लोकांचा पाठलाग करू लागतात.

कुत्र्याने तुमचा पाठलाग केला तर घाबरून पळून जाण्याऐवजी मागे वळा आणि स्वतः आक्रमक व्हा आणि त्यांच्यावर ओरडा.

असे केल्याने कुत्रे घाबरतात आणि माघार घेतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.

कुत्र्यांची टोळी असल्यास, तुम्ही तुमच्या सुरक्षिततेसाठी काठी, वीट, दगड उचलून त्यांना घाबरवू शकता.