दह्यामध्ये नेमकं काय घालून खावं... साखर की मीठ?

काहीजण दही खाताना त्यात मीठ तर काहीजण त्यात साखर घालून खाण पसंत करतात.

पण आयुर्वेदात दह्याचे सेवन कसे करावे याविषयी सांगितलं आहे.

दही आरोग्यासाठी कितीही चांगलं असलं तरी दररोज दह्याचं सेवन करू नये.

रात्रीच्या जेवणात दही खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

रात्रीच्या जेवणात दही खादह्यात मीठ टाकून खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. तसेच पोटातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.

हाय ब्लड प्रेशरचा त्रास असलेल्या रुग्णांनी दह्यात मीठ मिसळून खाऊ नये

दररोज मीठ घालून दही खाऊ नये. कारण यामुळे त्वचेच्या संबंधित समस्या उद्भवू शकतात. तसेच केस गळती, तरुणपणीच केस पांढरे होणं, त्वचेवर पुरळ येणं इत्यादी समस्या जाणवू लागतात.

दह्यात साखर मिसळून खाणे अधिक फायदेशीर ठरू शकत. दह्यात जेव्हा साखर मिसळली जाते तेव्हा दही जास्त थंड राहते.

उन्हाळ्यात दह्याची लस्सी बनवून प्यायल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.

लस्सीचे सेवन आरोग्यासाठी चांगले असले तरी त्याचे सेवन मर्यादेतच करावे.

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)