पोटात जंत झाल्यावर दिसू लागतात 8 लक्षणं

पोट दुखीमागे आरोग्याशी संबंधित अनेक कारण असतात. परंतु जर तुमचं पोट सतत दुखत असेल तर हे पोटात जंत झाल्याचे लक्षण असू शकते.

पोटात जंत झाले की उलटी, मळमळ यासारख्या समस्या जाणवू लागतात.

पोटात जंत झाल्यावर मलाशयाच्या ठिकाणी खाज येते आणि रात्रीच्या वेळी ती खाज आणखीन वाढते.

जीभेचा रंग पांढरा होणे हे देखील पोटात जंत झाल्याचे लक्षण आहे.

काही कारणाशिवाय वजन कमी होणं हे देखील पोटात जंत झाल्याचं एक लक्षण आहे. अशा स्थितीत व्यक्तीला भूक कमी लागते.

जर तुम्हाला खूप थकवा जाणवत असेल तर हे सुद्धा पोटात जंत झाल्याचे लक्षण आहे.

पोटात जंत झालेल्या व्यक्ती सतत दात कुरतडतात. अशी लक्षणं जाणवल्यास वेळीच डॉक्टरांकडे जायला हवे.

पोटात जंत झाल्यावर शरीरातून बाहेर पडणाऱ्या मालमध्ये पांढऱ्या रंगाचे किडे दिसू लागतात. अशावेळी डॉक्टर पोटातील जंत नष्ट करण्यासाठी काही औषध देतात.

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा