हे लोक जितके जाड तितकी जास्त इज्जत, पोट वाढवण्यासाठी करतात वेगवेगळे उपाय

आजकाल 6 पॅक आणि 8 पॅक ऍब्सचे युग आहे.

पण आफ्रिकेत एक अशी जमात आहे ज्यात पुरुषांना लठ्ठ व्हायचे असते.

आफ्रिकेतील बोडी जमात इथिओपियामध्ये आढळते.

येथील तरुण पुरुष गाईचे रक्त दुधात मिसळून पितात जेणेकरून ते लठ्ठ होऊ शकतात.

रक्त पिण्यासाठी ते गायीला मारत नाहीत, तर तिच्या शरीरातील रक्तवाहिनी कापतात.

आणि तिचं रक्त तिच्या दुधात मिसळून पितात

इथे पोटाची चरबी वाढवणाऱ्या पुरुषांना संपूर्ण जमाती हिरो मानतात.

येथे नवीन वर्षाच्या दिवशी कायल नावाचा समारंभ होतो.

ही पुरुषांमधील स्पर्धा आहे ज्यामध्ये अविवाहित पुरुषांना रक्त आणि दूध यांचे मिश्रण प्यावे लागते.