पाऊस पडल्यावर आंबे खावे की नाही?   

आंबा हा अनेकांचं आवडत फळ आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात मनसोप्त आंबे खाण्याचा आनंद घेतात.  

परंतु पावसाळा सुरु झाल्यावर आंबे खाण टाळावं असं म्हंटल जातं.

तेव्हा पाऊस पडल्यावर आंबे खावेत की नाही याविषयी जाणून घेऊयात?

आयुर्वेदानुसार फळ ही ठरलेल्या ऋतूमध्येच खावीत. उदा. आंबा हा उन्हाळ्यात येतो तेव्हा त्याचे सेवन सुद्धा उन्हाळा असे पर्यंतच करावे.

आंबा हा मुळतः गरम असतो, अशावेळी जर तुम्ही आंबा पाऊस सुरु झाल्यावर खाल्लात तर वात आणि कफचा त्रास होऊ शकतो.

पावसाळ्यात आंबे खाल्ल्याने चेहऱ्यावर मुरूम येण्याची समस्या सुद्धा होऊ शकते.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार पाऊस सुरु झाल्यावरच नव्हे तर पाऊस यायच्या आधी म्हणजे ऋतुसंधीकाळामध्ये सुद्धा आंबे खाणे टाळावे.

पावसाळा सुरु झाल्यावर आंबे खाल्ल्याने अपचन, पोटफ़ुगी, अम्लपित्त, जुलाब यासारखे त्रास होऊ शकतात.

तज्ज्ञांच्यानुसार पावसाळ्यात आंबा खाल्ल्याने सर्दी, दम्याचा त्रास देखील वाढताना दिसतो.

नाकातून पाणी येणे, शिंका येणे, छातीमध्ये कफ जमून घुर्‌-घुर्‌ आवाज येणे, श्वास घेताना छाती जड होणे, दम लागणे इत्यादी समस्या आंब्यामुळे होऊ शकतात.

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा