घरीच बनवा टेस्टी आणि थंडगार काजू-बदाम कुल्फी!

उन्हाळ्यात आईस्क्रीम खावेसे वाटणे स्वाभाविक आहे.

आज आम्ही तुम्हाला काजू- बदामाची कुल्फी घरी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत.

यासाठी तुम्हाला 20-25 काजू, अर्धा लिटर दूध, 1/4 वेलची, 20-25 बदाम, 10 चमचे गूळ, 3 टेबलस्पून मलई लागेल.

सर्वप्रथम 25 बदाम आणि 25 काजू बारीक करून पेस्ट बनवा.

आता अर्धा लिटर दूध गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा.

दूध उकळू लागले की त्यात काजू-बदामाची पेस्ट मिक्स करा.

पेस्ट नीट मिसळल्यानंतर, दूध सुमारे 15 मिनिटे उकळवा. 

नंतर दुधात वेलची पावडरसह 10 चमचे गूळ घाला.

आता या सर्व गोष्टी नीट मिसळा आणि काही मिनिटांनी गॅस बंद करा.

कुल्फीचे मिश्रण थोडावेळ थंड होऊ द्या. आता हे मिश्रण सेट करण्यासाठी कुल्फीच्या साच्यात भरून फ्रीजरमध्ये ठेवा.

काही तास फ्रीझरमध्ये ठेवल्यानंतर कुल्फी बाहेर काढा आणि खाण्याचा आनंद घ्या.