असं ओळखा रसाळ लिंबू, वाढेल लिंबूपाणी पिण्याची मजा!

लिंबाचा वापर पाण्यापासून ते सॅलडपर्यंत सर्व गोष्टींमध्ये केला जातो.

उन्हाळ्यात तर लिंबाची मागणी खूप वाढते.

पण अनेकदा बाजारातून लिंबू आणल्यानंतर ते रसाळ नसतात.

जाणून घेऊया रसाळ लिंबू ओळखण्यासाठी काही सोप्या युक्त्या. 

लिंबू खरेदी करताना त्याच्या सालीकडे लक्ष द्या.

जर साल पातळ आणि चमकदार असेल तर लिंबू रसाळ असेल.

रस नसलेले लिंबू थोडे कोरडे आणि वजनाने हलके असतात.

तसेच रसाळ लिंबू वजनाने जड आणि दिसायला ताजे असतात.

जेव्हा तुम्ही बाजारातून लिंबू खरेदी कराल तेव्हा ते पिळून पहा. 

दाबल्यानंतर लिंबू मऊ लागले तर ते रसाळ असतात. 

लिंबू खरेदी करताना त्याच्या रंगाकडे विशेष लक्ष द्या.

जे पिवळे आणि मऊ असतात असे लिंबू विकत घ्या. ते रसाळ असतात.