जेवणानंतर किती वेळ चालल्याने होतो जास्त फायदा?

जेवण केल्यानंतर तुम्ही लगेच चालू शकता.

जेवल्यानंतर काही वेळ चालावे हे आपल्याला माहित आहे.

परंतु किती वेळ चालावे याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो.

तज्ञांनुसार जेवणानंतर आपण 20 मिनिटे चालले पाहिजे.

जेवणानंतर चालण्याने अन्न लवकर पचण्यास मदत होते.

जेवण केल्यानंतर चालण्यामुळे पचनसंस्था निरोगी राहते.

तसेच जेवणानंतर चालण्याने वजनही नियंत्रणात राहते.

रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रित राहण्यास मदत होते.

जेवणानंतर चालल्याने शरीराची रोग प्रतिकारशक्तीही वाढते.

तुम्ही तणावात असाल तर यामुळे तुमचा तणावही कमी होऊ शकतो.