साप जीभ बाहेर का काढतो?

साप हा सर्वात विषारी प्राण्यांपैकी एक आहे. तो एका दंशामध्ये एखाद्याचे प्राण घेऊ शकतो.

कधीकधी त्याच्या दंशामुळे माणसाला पॅरालिसीसचा देखील धोका उद्भवतो. हे आपल्या सर्वांना माहित आहे.

सापाबद्दल अशा काही गोष्टी आहेत, ज्याबद्दल अनेकांना माहिती नाही.

साप हा मांसाहारी जीव आहे. तो उंदीर, पाल, अन्य कीटक खातो. तसेच दूध हे सापाचे अन्न नाही.

याशिवाय सापाला कान नसतात आणि त्याला लांबचे ही दिसत नाही. सापाची स्मरण शक्ती अल्प असते.

तुम्ही अनेकदा सापाला जीभ बाहेर काढताना पाहिलं असेल पण तो असं का करतो हे माहितीय?

खरंतर साप जीभेने वास घेतो. त्यामुळे तो जीभ बाहेर काढून आसपासच्या प्राण्यांचा अंदाज घेत असतो.

जीभ काढल्यामुळे त्याला आजूबाजूला हालचाल होत असल्यास जाणवते.

कंपनातूनही तो सभोवताली कोणी असल्याचे जाणून घेतो. ज्यामुळे साप जीभ बाहेर काढतो.