जान्हवीची क्रिकेट थीम साडी!

अभिनेत्री जान्हवी कपूर मिस्टर अँड माही सिनेमाचं दणकून प्रमोशन करतेय.

जान्हवीचे क्रिकेट थीम साडीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

मिस्टर अँड मिसेस माही या सिनेमात जान्हवी कपूर अभिनेता राजकुमार रावबरोबर स्क्रिन शेअर करणार आहे.

सिनेमा 31 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सिल्विलेस ब्लाऊज आणि रेड व्हाइट लाइनिंगवाली साडी नेसून जान्हवी कपूरनं इंडिया गेटसमोर फोटोशूट केलं आहे.

जान्हवीनं मिस्टर अँड मिसेस माहीच्या प्रमोशनसाठी खास साड्या डिझाइन केल्या आहेत.

तिच्या रेड साडीच्या पडदावर क्रिकेट बॉलची डिझाइन करण्यात आली आहे.

जान्हवीनं फक्त साडीच्या पदराला नाही हातातील बॅग देखील सीझन बॉलच्या आकाराची बनवली आहे.

जान्हवीच्या या हटके लुकनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.