तांब्याच्या कलशाला का बांधला जातो धागा?

सनातन धर्मात कलव किंवा धागा बांधण्याची परंपरा फार जुनी आहे.

हा रंगीत धागा बांधल्याने संरक्षण मिळते, म्हणून त्याला रक्षासूत्र देखील म्हणतात.

कलशाला देखील हा धागा बांधला जातो. त्यामागचं कारण पंडितांनी सांगितलं आहे.

तांबे जितके शुद्ध तितक्या लवकर ते अशुद्ध ही होते.

त्याची शुद्धता राखण्यासाठी कलशात धागा बांधला जातो.

तांब्याच्या कलशात नऊ ग्रह वास करतात अशी धार्मिक मान्यता आहे.

तांब्याच्या कलशात कलव किंवा धागा बांधल्याने पूजा चांगली होते.

असे केल्याने पूजेत झालेल्या चुकीचा कोणताही वाईट परिणाम होत नाही.

यामुळे पूजेदरम्यान कोणत्याही प्रकारचा दोष होत नाही.