देसी गर्लनं घातला 358 कोटींचा नेकलेस!

देसी गर्लनं घातला 358 कोटींचा नेकलेस!

प्रियांका चोप्रा नुकतीच बल्गेरी या आंतरराष्ट्रीय ज्वेलरी ब्रॅण्डच्या एका कार्यक्रमात पोहचली होती.

प्रियांका चोप्रा बल्गेरी या आंतरराष्ट्रीय ज्वेलरी ब्रॅण्डची ब्रँड अँबॅसिडर आहे. अलीकडेच तिने या कार्यक्रमात हजेरी लावली होती.

प्रियांकाने यावेळी पांढऱ्या आणि काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर गाउन घातला होता.

यामध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती. या इव्हेंटमध्ये देसी गर्लच्या नव्या हेअरस्टाईलने सगळ्यांचंच लक्ष वेधलं.

यामध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती. या इव्हेंटमध्ये देसी गर्लच्या नव्या हेअरस्टाईलने सगळ्यांचंच लक्ष वेधलं.

तिचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

200 कॅरेट हिऱ्यांचा समावेश असलेला हा सुंदर नेकलेस बनवण्यासाठी सुमारे 2800 तास लागले

वोगच्या रिपोर्टनुसार, प्रियंका चोप्राने गळ्यात घातलेल्या या नेकलेसची किंमत तब्बल 358 कोटी रुपये आहे.

या महागड्या नेकलेसची तुफान चर्चा आहे.