PHOTO : या अभिनेत्याच्या प्रेमात आहे सोनाक्षी सिन्हा!
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आज 2 जून रोजी तिचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे.
या खास दिवशी तिच्या बॉयफ्रेंडने तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
सोनाक्षी अभिनेता झहीर इक्बालच्या प्रेमात असल्याचं बोललं जातंय.
दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
अनेकवेळा दोघंही पार्ट्या आणि इव्हेंटमध्ये एकत्र दिसतात.
पण दोघांनीही अद्याप आपल्या नात्याची कबुली दिलेली नाही.
अनेकवेळा दोघे एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करतात.
सोनाक्षी आणि झहीरने 'डबल XL' चित्रपटात एकत्र काम केलं होतं.
आता दोघे आपल्या नात्याची कबुली कधी देणार याकडे चाहत्यांचं लक्ष आहे.