'या' ठिकाणी जीन्स घालण्यावर सरकारची बंदी

जीन्स आता पुरुषच नाही तर महिलांच्याही जिवन शैलीचा भाग झाला आहे.

10 पैकी 8 लोक तुम्हाला जिन्सवर फिरताना दिसतील. जिन्स हा सर्वान कंफर्टेबल आणि सुरक्षित पेहेराव आहे.

पण तुम्हाला माहितीय की एक असं ठिकाण आहे जिथे सरकारने जिन्स घालण्यावर बंदी केली आहे?

कोणत्या देशात ब्लू जीन्सवर बंदी आहे ? असा प्रश्न अनेकांनी इंटरनेटवर सर्च केला असता त्यांना याचं उत्तर मिळालं

ते आहे उत्तर कोरिया.  हा देश आपल्या विचित्र कायद्यांसाठी ओळखला जातो.

इथं लोक जीन्स घालू शकत नाही. जीन्स घातल्यास शिक्षाही मिळते. पण असं का? असा प्रश्नही तुम्हाला आता नक्कीच पडला असेल.

जीन्सला अमेरिकन साम्राज्यवादाचं प्रतीक मानलं जातं. अमेरिका हा देशाचा कट्टर शत्रू असल्याने जीन्सवर बंदी घातली गेली आहे.

आश्चर्य म्हणजे उत्तर कोरियामध्ये जीन्स बनवण्यासाठी परवानगी आहे, परंतु ती परिधान केली जात नाही.

नोट : उत्तर कोरियामध्ये जीन्स घालण्यावर बंदी आहे, हा प्रचलित समज आहे. याची कोणीही पुष्टी केलेली नाही.