दिवसातून किती वेळा पॅड बदलणं गरजेचं?

पीरियड्स ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मासिक पाळीदरम्यान महिलांना वेदना होतात.

मासिक पाळीच्या काळात महिलांनी त्यांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची अधिक काळजी घेतली पाहिजे.

पीरियड्सच्या काळात महिलांच्या मनात एक प्रश्न उद्भवू शकतो की, पॅड एका दिवसात किती वेळा आणि कोणत्या वेळी बदलावे?

याबद्दल कोणतंही थेट आणि निश्चित उत्तर नाही. कारण, हे मासिक पाळीदरम्यानच्या रक्तप्रवाहावर अवलंबून असते.

स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांच्या मते, पॅड दिवसातून किमान 3 वेळा आणि दर 6 ते 7 तासांनी बदलले पाहिजेत.

एकच पॅड जास्त वेळ वापरल्याने संसर्गाचा धोका वाढू शकतो.

ओलेपणा, गळती, गंध किंवा पॅडमधून अस्वस्थता पॅड बदलण्याची चिन्हे मानू शकतात

बाजारात विविध प्रकारचे सॅनिटरी पॅड्स उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि सोयीनुसार पॅड निवडू शकता.