beer: बिअरमुळे खरंच पोट वाढतं का?
अनेकांना चिल्ड बिअर प्यायला खूप आवडते.
चिल्ड बिअर पिण्याची मजा काही वेगळीच असते असं म्हटलं जातं.
मात्र या चिल्ड बिअरमुळे आरोग्याचं नुकसानही होतं.
असाही समज आहे की, चिल्ड बिअरमुळे पोट वाढतं.
बिअरमुळे पोट वाढतं, आता यामध्ये किती तथ्य आहे जाणून घेऊया.
तज्ज्ञांच्या मते, अल्कोहोल फॅट बर्न करण्याच्या प्रक्रियेत बाधा आणते. त्यामुळे पोटाची चरबी वाढते.
जास्त प्रमाणात अल्कोहोल प्यायल्यानं तुमच्या शरीरातील पोषक घटक कमी होऊ शकतात.
तज्ज्ञांचा दावा आहे शरीरात अल्कोहोलचे प्रमाण जास्त असेल तर ते शरीरातून मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी कमी करू लागते.
अल्कोहोलचं घेण्याचं प्रमाण जास्त असेल तर फॉलिक ॲसिड आणि झिंकही शरीरातून नष्ट होऊ शकतात.