तिसऱ्यांदा लग्न करणार ही अभिनेत्री!

तिसऱ्यांदा लग्न करणार ही अभिनेत्री!

टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे चाहत खन्ना.

चाहत खन्नाने आपल्या आयुष्यात दोनदा संसार मोडण्याचं दुःख भोगलं आहे.

दोनदा लग्न मोडल्यानंतर चाहत खन्ना आता तिच्यापेक्षा चार वर्षांनी लहान अभिनेता रोहन गंडोत्राला डेट करत आहे.

वयाच्या 37 व्या वर्षी ही अभिनेत्री आता तिसऱ्यांदा संसार थाटण्याच्या विचारात आहे.

चाहत आणि रोहन यांनी आपलं नातं लपवून ठेवलं आहे.

सध्या दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. तसेच चाहत रोहनबरोबरचं नातं पुढे नेण्यास तयार असल्याचीही चर्चा आहे.

दोघांच्या लग्नाच्या बातम्यांना उधाण आलं आहे

ते खरंच लग्न करणार का, हे जाणून घेण्यासाठी चाहत व रोहनच्या प्रतिक्रियेची वाट पाहावी लागणार आहे.

दोन मुलींची आई असलेली ही अभिनेत्री आता खरंच तिसरं लग्न करणार का ते पाहणं महत्वाचं आहे.