एका चित्रपटासाठी इतके कोटी फी घेते दीपिका!

बॉलिवूडची टॉप अभिनेत्री म्हणजे दीपिका पदुकोण.

शाहरुख खानसोबत बॉलिवूडमध्ये एंट्री घेतलेल्या दीपिकानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.

तिच्या अभिनय आणि सौंदर्याचे लाखो दिवाने आहेत.

दीपिका लवकरच आई होणार आहे. त्याआधी तिने एक यश मिळवलं आहे.

फोर्ब्सच्या भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींची यादी समोर आहे.

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण 2024 मध्ये सर्वात महागडी अभिनेत्री ठरली आहे.

आलिया भट्ट, कंगना रणौत, प्रियांका चोप्रा आणि ऐश्वर्या राय यांना मागे टाकून अभिनेत्रीनं फोर्ब्सच्या या यादीत अव्वल स्थान पटकावलं आहे.

दीपिका पदुकोण एका चित्रपटासाठी 15 ते 30 कोटी रुपये घेते.

तिची नेटवर्थ सुद्धा कोट्यवधी रुपये आहे.