ग्लेशियरच्या पाण्यात प्रिया बापटची डुबकी !

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया बापट हिनं जे काही केलंय ते आजवर कोणत्याच अभिनेत्रीला जमलेलं नाही.

प्रियानं यावेळी थेट हिमनदीच्या पाण्यात डुबकी मारायचं ठरवलं.

प्रियानं शेअर केलेल्या फोटोंमध्ये ग्लेशियरच्या थंड पाण्यात उतरली आहे.

"पाणी खूप थंड होतं, पण मी एकदा स्वत:ला त्यात विसर्जित केलं आणि पुरेपूर अनुभव घेतला", असं प्रिया म्हणाली.

"एकट्यानं वेळ घालवणं महत्वाचं आहे", असंही प्रिया म्हणाली.

प्रियाच्या एडव्हेंचर ट्रिपला चाहत्यांची पसंती मिळतेय.

फिरण्यात आणि एडव्हेंचर करण्यात मराठी कलाकारही काही कमी नाहीत हे प्रियानं दाखवून दिलं.

प्रियाच्या सोलो ट्रिपचे फोटो सध्या चर्चेत आहेत.