बॉयफ्रेंडपेक्षा इतक्या वर्षांनी मोठी आहे श्रद्धा कपूर!

श्रध्दानं बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली.

श्रद्धा कपूरच्या बॉयफ्रेंडचं नाव राहुल मोदी असं आहे.

त्यानं व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल इन्स्टिट्यूटमधून फिल्म मेकिंगचं शिक्षण घेतल्याची माहिती आहे.

यानंतर तो चित्रपटाच्या सेटवर इंटर्न म्हणून काम करू लागला.

राहुल मोदीचा जन्म 7 ऑक्टोबर 1990 रोजी झाला. 

राहुल मोदी हा मुंबईचाच रहिवासी असून त्याच्या कुटुंबीयांचा बिझनेस आहे. 

श्रद्धा कपूरचा जन्म 3 मार्च 1987 रोजी झाला. 

दोघांच्या वयात तीन वर्षांचा फरक आहे. 

श्रद्धाच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटाची कथा देखील राहुल मोदीनेच लिहिली होती. तेव्हापासून त्यांच्यात प्रेम फुललं आणि दोघे प्रेमात पडले.