अचानक कारचा ब्रेक फेल झाल्यावर काय करावं?

गाडी चालवताना अचानक ब्रेक फेल झाला तर अशा वेळी काय करावं? याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.

गाडी चालवताना ब्रेक खराब झाला तर घाबरुन जाऊ नका. गाडीतून बाहेर उडी मारण्यापेक्षा फक्त शांततेत काही गोष्टींवर फोकस करा. 

चालू गाडीचा ब्रेक फेल झाल्यावर लोक पॅनिक होऊन गाडीतून बाहेर उडी मारतात.

 याशिवाय गाडी कुठे झाडाला किंवा खांबाला धडकवात जेणेकरुन गाडीचा वेग कमी होईल. मात्र असं काहीही करण्याची गरज नाही.

सर्वात पहिल्यांदा ब्रेक फेल होताच तुम्हाला गाडीत असलेल्या हजार्ड वॉर्निंग लाइट्सला ऑन करायचं आहे. 

यामुळे तुमच्या आजुबाजूला असलेल्या गाड्यांना समजेल की या गाडीत काहीतरी बिघाड झालाय.

त्यानंतर दुसरी गोष्ट तुम्हाला करायची आहे ती म्हणजे, स्टीयरिंगला कंट्रोल करुन ठेवा. ज्यामुळे गाडी योग्य दिशेने चालत राहिल आणि दुर्घटना टळू शकेल.

दुसऱ्या हाताने मॅकनिकल हॅंडब्रेकला पकडा आणि त्याच्या बटणाला आतल्या बाजूला दाबा. त्याला वर खाली करत राहा. 

हॅंडब्रेकला अनेकदा वर खाली केल्यामुळे गाडी लवकर थांबू शकते.