आत्म्याचं वजन किती असतं? 

माणसांच्या मृत्यूनंतर त्याच्या आत्म्याचं काय होतं? याविषयी अनेक वेगवेगळे दावे केले जातात.

 आत्म्याविषयी अनेक गोष्टी ऐकायला मिळतात. मात्र आत्म्याचं वजन किती असतं हे तुम्हाला माहितीय का?

ज्या आत्म्याला आपण पाहू शकत नाही, फील करु शकत नाही, अशा आत्म्याचं वजन कसं करु शकतो? 

मात्र याविषयी डॉक्टरनं केलेला दावा चर्चेचा विषय ठरतोय.

1909 मध्ये डंकनडॉगल नावाच्या डॉक्टरने 4 साथीदारांना घेऊन एक प्रयोग केला होता. मृत्यूच्या पूर्वी आणि मृत्यूनंतर काही रुग्णांवर हा प्रयोग झाला. 

मृत्यूच्या अगदी जवळ केलेल्या व्यक्तींवर हा प्रयोग केला होता. मरण्याच्या आधी आणि नंतर शरीराच्या वजनामध्ये 21 ग्रॅमचं अंतर होतं.

या प्रयोगानंतर डॉक्टर डंकनडॉगल यांनी त्या 21 ग्रॅमलाच आत्म्याचं वजन सांगितलं. 

डॉक्टरने सांगितलं, प्रत्येक रुग्णाचं वजन वेगवेगळं होतं मात्र मृत्यूनंतर सर्वांचं वजन 21 ग्रॅमने हलकं झालं.

डॉक्टर डंकनडॉगलच्या या दाव्याला इतर डॉक्टरने मानन्यास नकार दिला. मात्र हा दावा खूप चर्चेत आला.