स्टार क्रिकेटरची पत्नी केक विकून कमवते करोडो रुपये

टीम इंडियाचा ऑल राउंडर खेळाडू असणारा शार्दूल ठाकूर याने 27 फेब्रुवारी 2023 मध्ये त्याची मैत्रीण मिताली परुळकर हिच्याशी विवाह केला.

मितालीची ओळख केवळ क्रिकेटरची पत्नी म्हणून नाही तर एक बिझनेस वूमन म्हणून सुद्धा आहे.

मितालीने काही वर्षांपूर्वी एक स्टार्टअप बिझनेस सुरु केला होता.

आता या बिझनेसमधून मिताली ही वर्षाला करोडो रुपये कमवत आहे.

मितालीला स्वतः केक बनवायला भरपूर आवडायचं.

शार्दुलची पत्नी मिताली हिचं ठाण्यात ऑल जॅझ बेकरी नावाचं दुकान आहे.

या ठिकाणी विविध प्रकारचे केक आणि बेकरी प्रोडक्ट्स उपलब्ध असतात.

लग्झरी बेकरी बिझनेसमधून तिची जवळपास 2 ते 3 कोटी रुपयांची नेटवर्थ आहे.

मिताली ही एक कॉमर्स ग्रॅज्युएट असून काही वर्ष जॉब केल्यावर तिने स्टार्टअप बिझनेस सुरु केला.

मिताली तिचा पती शार्दूल याला चिअर करण्यासाठी क्रिकेट मॅच दरम्यान स्टेडियममध्ये उपस्थित असते.