ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामन्यात रोहित शर्माचे 6 पराक्रम

टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात रोहित शर्माने दमदार कामगिरी केली.

रोहित शर्माने तुफान फटकेबाजी करून ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना घाम फोडला.

कर्णधार रोहितने या सामन्यात ४१ बॉलमध्ये ९२ धावांची खेळी केली. या दरम्यान त्याने ७ चौकार आणि ८ सिक्स ठोकले.

रोहितने दमदार कामगिरी करताना टी २० क्रिकेटमध्ये २०० हून अधिक सिक्स मारण्याचा विक्रम केला. असा रेकॉर्ड करणारा तो जगातील पहिलाच खेळाडू ठरला.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना रोहितने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 19 हजार धावा सुद्धा पूर्ण केल्या.

रोहित शर्मा टी २० वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक बाऊंड्री मारणारा खेळाडू ठरला.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध रोहितने सर्वाधिक 132 सिक्सर मारणारा भारतीय फलंदाज ठरला आहे.

रोहित शर्माने टी २० वर्ल्ड कप २०२४ मधील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले. त्याने केवळ १९ बॉलमध्ये ५० धावा पूर्ण केल्या.

रोहित शर्मा टी २० वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे.