सध्या हेडफोन, इअरफोन इत्यादींचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
पूर्वी वायर असणारे हेडफोन, इअरफोन असायचे मात्र आता bluetooth हेडफोन आल्याने अनेकांच्या कानाला सतत लावलेले असतात.
मात्र हेडफोनमुळे कानाची ऐकण्याची क्षमता हळूहळू कमी होऊ लागते आणि बहिरेपणा येऊ शकतो.
तेव्हा वयानुसार हेडफोनचा वापर किती वेळ करावा याविषयी माहिती करून घेऊयात.
19 ते 29 वयोगट - जर तुम्ही या वयोगटात असाल तर हेडफोन किंवा इअरफोनचा वापर दर आठवड्याला कमाल 7.8 तास, दरमहा 33.9 तास आणि वर्षाला 405.6 तासांपर्यंत मर्यादित ठेवावा.
30 ते 49 वयोगट - जर तुम्ही या वयोगटात असाल तर हेडफोन किंवा इअरफोनचा वापर दर आठवड्याला 5.5 तास, दरमहा 23.9 तास आणि प्रति वर्ष 286 तासांपर्यंत मर्यादित ठेवला पाहिजे.
50 ते 79 वयोगट- जर तुम्ही या वयोगटात असाल तर दर आठवड्याला जास्तीत जास्त 5.2 तास, दर महिन्याला 22.6 तास आणि प्रति वर्ष 270.4 तास हेडफोनचा वापर करावा.
तुम्ही हेडफोन वापरता असाल तर त्याचा आवाज 105-110 डेसिबलपर्यंत नसावा.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. तेव्हा अधिक माहितीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)