कधी करणार ईशा-ऋषी लग्न?

अभिनेत्री ईशा केसकर आणि अभिनेता ऋषी सक्सेना अनेक वर्ष लिव्ह-इनमध्ये राहत आहेत.

दोघे लग्न कधी करणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

मागील 4-5 वर्षांपासून ऋषी आणि ईशा रिलेशनशिपमध्ये आहेत.

दोघे लग्न कधी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

ऋषी आणि ईशा लवकरच लग्न करणार आहेत अशा चर्चाही रंगल्या होत्या.

नुकत्याच एका मुलाखतीत ऋषीनं त्यांच्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे.

सध्या तरी आमचा लग्नाचा विचार नाहीये. पण हो आम्ही लग्न करणार आहोत पण इतक्यात नाही",असं ऋषीनं सांगितलं.

2018पासून दोघे एकमेकांना डेट करत आहेत.