डोळ्यांसाठी कोणता रंग फायदेशीर?

डोळ्यांच्या मदतीनं आपण संपूर्ण जग पाहू शकतो. लहानापासून मोठी गोष्ट पाहू शकतो.

अनेक प्रकारचे रंग आपण बघतो. मात्र तुम्हाला माहितीय का आपल्या डोळ्यांना कोणता रंग आराम देतो?

असा कोणता रंग आहे ज्याला पाहिल्यावर डोळ्यांना आराम मिळतो. 

माणसाच्या डोळ्यांना निळा आणि हिरवा रंग आराम देतो. 

या दोन्ही रंगाचे हलके शेड्स डोळ्यांसाठी आरामदायी असतात.

या दोन रंगावर शास्त्रज्ञांनीही रिसर्ज केला आहे. हे रंग डोळ्यांसाठी थंड असतात. त्यामुळे डोळ्यांना हे रंग सुखावणारे असतात.

निळ्या आणि हिरव्या रंगाशिवाय डोळ्यांवर आणखी एक रंग जास्त प्रभावी असतो. तो रंग म्हणजे लाल.

दरम्यान, डोळे हे शरीरातील नाजूक भाग असल्यामुळे त्यांची अधिक काळजी घ्यावी लागते. 

कारण हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा डोळ्यांना इजा पोहचवू शकतो.