फणसाला संस्कृत भाषेत काय म्हणतात? 

फणस हे बाहेरून काटेरी दिसत असलं तरी आतून अतिशय रसाळ फळ आहे.

पिकलेले फणस हे जून जुलै दरम्यान बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होतात.

फणस हे गोड फळ असलं तरी तो कच्चा असताना त्याची भाजी सुद्धा केली जाते.

फणसात व्हिटॅमिन ए, सी, थायमिन, पोटॅशियम, कॅल्शियम, आयरन यासारखे पौष्टिक घटक असतात.

फणसात भरपूर फायबर असते आणि यात कॅलरीज न च्या बरोबर असतात.

गावाकडे फणसाची मोठी झाड असतात अशा झाडांना फणस हे अगदी खाली बुंध्यांपासून ते फांदीपर्यंत लागलेले असतात.

फणसात कापा आणि बरका असे दोन प्रकार असतात.

फणसाला इंग्रजी भाषेत जॅकफ्रुट (jackfruit) असं म्हणतात.

फणसाला हिंदीमध्ये कटहल असं म्हणतात.

फणसाला संस्कृतमध्ये पनसम् असं म्हणतात. तर अनेकदा याचा उल्लेख पनसफलं असा सुद्धा केला जातो.  

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा