पावसाळ्यात एसीमधून का टपकत पाणी?

भारताच्या अधिकतर शहरांमध्ये पावसाला सुरुवात झाली असली तरी ह्युमिडिटीमुळे काहीवेळा उकाडा सुद्धा जाणवतो. त्यामुळे अनेकजण पावसाळ्यात सुद्धा एसीचा वापर करतात.

पावसाळ्यात काही लोकांच्या इनडोअर युनिटमधून पाणी टपकत असतं. मात्र याची कारण कोणती आणि ही समस्या कशी ठीक करावी याबाबत माहिती जाणून घेऊयात.

विंडो एसीमध्ये अधिकतर अशी समस्या होत नाही. पण Split AC मध्ये पावसाळ्यात अशा समस्या जाणवतात.

Split AC मधील फिल्टर खराब झाल्याने एसी मधील इनडोअर युनिटचं ड्रेनेज सिस्टिम ब्लॉक होऊन जात. ज्यामुळे पाणी रूमच्या आतमध्ये पडतं.

पावसाळ्याच्या दिवसात आद्रता जास्त असते त्यामुळे एसीमधून पाणी बाहेर येऊ शकतं. परिणामी एसीचा ड्रेन पॅन खराब होऊ शकतो.

Split AC मध्ये इंस्टोलेशनला घेऊन प्रॉब्लेम असेल तर यामुळे सुद्धा एसीच्या बाहेर पाणी येऊ शकत.

Split AC ला रिपेअर करण्यासाठी कंपनीच्या टेक्निशियनलाच बोलवावे. प्रॉब्लेमकडे दुर्लक्ष केल्यास एसी कायमचा खराब होऊ शकतो.

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा