2007 चा तो वर्ल्डकप आणि Road Show, क्रिकेट विश्वातील ते ऐतिहासिक Photo

साऊथ आफ्रिकेला हरवल्यानंतर टीम इंडियाने वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली, ज्यांनंतर एकच जल्लोष झाला

मुंबईच्या रस्त्यावर टीम इंडियाचा रोड शो पाहायला मिळणार आहे. यासाठी क्रिकेट प्रेमींची उत्सुक्ता आहे.

मुंबईचा राजा रोहित शर्माला पाहण्यासाठी लोकांना जास्त उत्सुकता आहे. 

पण तुम्हाला माहितीय का की असंच दृश्य 2007 मध्येच पाहायला मिळालं होतं.

MS धोनी आणि कंपनीने भारतासाठी 2007 ला T20 विश्वचषक जिंकला तेव्हा ही मुंबईच्या रस्त्यांवर रोड शो झाला.

तेव्हा हजारो चाहते खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी अभिमानाने आणि आनंदाने रस्त्यावर उभे होते. तो दिवस आणि त्याची झलक या प्रसंगी नक्कीच आठवते.

धोनी, युवराज सिंग, हरभजन, रोहित यांच्या हातात विजयाची ट्रॉफी पाहून सर्वांनाच आकाश ठेंगणं झालं होतं.

तेव्हाही ओपन बसमधून खेळाडूंचा रोड शो काढण्यात आला होता.

त्यावेळेचे चेहरे मात्र वेगळे होते, पण लोकांची भावना आणि उत्साह मात्र तेवढाच आहे.

2007 च्या वर्ल्डकपचा ही रोहित शर्मा भाग होता. पण दोन्ही वेळेला तो आपल्याला वेगळ्या भूमीकेत दिसला.